मित्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला MIDC Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत गट अ, ब, व क संवर्गातील 749 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
मित्रहो तुमची जर Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला खाली या भरतीबद्दल रिक्त पदाचे नाव, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा तसेच या भरतीची Notification PDF Download ची लिंक व ई. सर्व माहिती देलेली आहे.
पदाचे नाव :–
पदांची नावे | रिक्त जागा |
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | 03 जागा |
उप अभियंता (स्थापत्य) | 13 जागा |
उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी) | 03 जागा |
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) | 105 जागा |
सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) | 19 जागा |
सहाय्यक रचनाकार | 07 जागा |
सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ | 02 जागा |
लेखा अधिकारी | 03 जागा |
क्षेत्र व्यवस्थापक | 07 जागा |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 17 जागा |
लघुलेखक (उच्च श्रेणी) | 13 जागा |
लघुलेखक (निम्न श्रेणी) | 20 जागा |
लघुटंकलेखक | 06 जागा |
सहाय्यक | 03 जागा |
लिपिक टंकलेखक | 66 जागा |
वरिष्ठ लेखापाल | 05 जागा |
तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2) | 32 जागा |
वीजतंत्री (श्रेणी-2) | 18 जागा |
पंपचालक (श्रेणी-2) | 102 जागा |
जोडारी (श्रेणी-2) | 34 जागा |
सहाय्यक आरेखक | 08 जागा |
अनुरेखक | 49 जागा |
गाळणी निरीक्षक | 02 जागा |
भूमापक | 25 जागा |
अग्निशमन विमोचक | 187 जागा |
एकूण जागा | 749 जागा |
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 749 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी 21,700 ते 2,08700 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 08 जानेवारी 2025 पासून 31 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी गट अ व ब संवर्गातील पदांसाठी 21 ते 38 व गट क संवर्गातील पदांसाठी 18 ते 38 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
अर्ज शुल्क :–
खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रूपये, तसेच मागास प्रवर्गासाठी 100 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.
शैक्षणिक अर्हता –
या भरतीसाठी उमेदवार 10वी/ ITI/ डिप्लोमा/ संबंधीत पदवी पास असणे गरजेचे आहे
- कार्यकारी अभियंता (स्थापत्य): (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03/07 वर्षे अनुभव
- उप अभियंता (स्थापत्य): (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी): (i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- उप मुख्य लेखा अधिकारी: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA (फायनान्स)
- सहाय्यक अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
- सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी): विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
- सहाय्यक रचनाकार: स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी
- सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ: वास्तुशास्त्र पदवी
- लेखा अधिकारी: B.Com पदवी उत्तीर्ण
- क्षेत्र व्यवस्थापक: कोणत्याही शाखेतील पदवी
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
- लघुलेखक (उच्च श्रेणी): (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
- लघुलेखक (निम्न श्रेणी): (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
- लघुटंकलेखक: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
- सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी
- लिपिक टंकलेखक: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT
- वरिष्ठ लेखापाल: B.Com
- तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2): औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
- वीजतंत्री (श्रेणी-2): (i) ITI (विद्युत) (ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
- पंपचालक (श्रेणी-2): (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (तारयंत्री)
- जोडारी (श्रेणी-2): (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (जोडारी)
- सहाय्यक आरेखक: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन) (ii) Auto-CAD
- अनुरेखक: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
- गाळणी निरीक्षक: B.Sc (Chemistry)
- भूमापक: (i) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण (ii) Auto-CAD
- अग्निशमन विमोचक: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन कोर्स (iii) MS-CIT
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना संपुर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे, फिजिकल चाचणी/ ट्रेड चाचणी, मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
कृपया अर्ज करण्याआधी या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.
या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नवीन शुद्धीपत्रक : येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: रेल्वे ग्रुप डी भरती 2025
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला एमआयडीसी भरती 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि MIDC मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.